
परीक्षेला बसू शकलो नाही म्हणून तेलंगणाची वाट धरली
खानापूर (प्रतिनिधी) : आठवडाभर तालुक्यांत चर्चेचा विषय ठरलेल्या कोडचवाड (ता. खानापूर) येथील संपतकुमार या बेपता युवकाचा शोध लावण्यास नंडगड व त्यांचा पूर्ण तपास पोलीस पथकाला यश आले असले तरी तो फिल्मी स्टाईलने बेपत्ता का? झाला असा प्रश्न तालुकावासियांना पडला आहे.
नुकतेच पोलिसांनी सदर युवकाचा जबाब पोलिसांनी घेतला असता त्याने दिलेले कारण पोलिसांना चक्रावून सोडणारा आहे. तो म्हणतो की, मी परीक्षेला बसलो नाही, घरचे रागावतील म्हणून तेलंगणाला गेलो असल्याचे उतर दिले. मात्र हे उतर एवढ्या मोठ्या घटनेला पुरेसे नसून, बेपत्ता होण्याचा प्रकार पाहता सदर युवक काही लपवत आहे का? त्याच्याकडून असे उतर मिळाले तर पुढचा तपास कसा करायचा अशा संभ्रमावस्थेत पोलीस पडले आहेत.
तो युवक कुठून कोठे कसा? गेला
संपतकुमार याच्या माहीतीनुसार नदीकाठी दुचाकी व बॅग नदीत टाकून खानापूर स्थानकातून बेळगांव गाठले आणि तेथून पुढे सोलापूर गाडी पकडली. सोलापूरहून तेलंगणात गेलो असल्याचे उतर दिले. तर तो एकदा म्हणतो सोलापूरहून नागपूर गाठले. जवळपास हजारो किमी प्रवासात अनेक ठिकाणी कामाचीही चौकशी केली, काम मिळाले नसल्याचे सांगितले. परंतु सदर युवक ज्या अवस्थेत सापडला ती अवस्था पाहता तो काही दिवस उपाशी पोटी असल्याने त्याची प्रकृती खालावल्याने दिसले. त्यामुळे त्याने सांगितलेला तेलंगणा प्रवास कसा केला. त्याच्या जबाबात काही तथ्य वाटत नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यामुळे हे प्रकरण कोणत्या पद्धतीने हाताळायचे असाच प्रश्न तपास अधिकाऱ्यांना सतावत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta