खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील नंदगड गावच्या दुर्गादेवी (आनंदगड किल्ला) मार्गावर डॅमच्या बाजूला शेतवडीत बिबट्या वाघाच्या हल्ल्यात बैलाचा बळी गेल्याची घटना शनिवारी दि. 4 रोजी घडली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, नंदगड येथील शेतकरी सुरेश चंद्रकांत रामगुरवाड्डी हे आपली जनावरे घेऊन शेतकामासाठी शेताकडे गेले होते. यावेळी बिबट्या वाघाने बैलाचा फडशा पाडला. ही बातमी समजताच खानापूर तालुक्याचे माजी आमदार व बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद चंद्रकांत पाटील हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व तालुका आरएफओ कविता इरानट्टी व त्याचे सहकारी वर्गाने ताबडतोब घटनेचा पंचनामा केला. तसेच वनखाते व शासनाच्यावतीने मदत व नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. खानापूर तालुक्यातील जंगलात हिंस्त्र प्राण्याकडून पाळीव जनावरांच्या बळी जाण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. नुकसान भरपाई मिळवून देण्याकडे मात्र तालुका प्रतिनिधीचे साफ दुर्लक्ष होत आहे. तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकारीवर्गाने जंगलभागातील शेतकरीवर्गाला जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी तालुक्याच्या जनतेतून होत आहे.
Check Also
गणेबैल टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन! बेकायदेशीर टोलनाका बंद करण्याची मागणी
Spread the love खानापूर : गणेबैल येथील बेकायदेशीर उभारण्यात आलेला टोल नाका बंद करण्यात यावा …