खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या वर्षभरापासून खानापूर-बेळगाव बससेवा अपूरी असल्याने खानापूरहून बेळगावला ये-जा करणार्या विद्यार्थी वर्गाचे तसेच नोकरवर्गाचे आतोनात हाल होत आहेत. सकाळच्यावेळी कॉलेज विद्यार्थी बसला लोंबकळत जाताना दिसत आहेत. इतकी बस प्रवाशानी बरलेली असते. अशावेळी विद्यार्थी लोंबकळत जाताना पडला तर याला जबाबदार कोण? असा सवाल पालक वर्गातून विचारला जात आहे.
इतकी समस्या असताना याकडे तालुका लोकप्रतिनिधींची डोळे झाक होताना दिसत आहे.
खानापूरच्या विद्यार्थी, नोकरवर्गाला दांडेली, हल्याळ, शिर्शी डेपोच्या बससेवेवर अवलंबून राहावे लागते. तर खानापूर-बेळगाव बसेवेचे वेळापत्रक हे नावापूरतेच आहे.
एक ही बस वेळेत धावत नाही. केवळ बस चालक व बस वाहक या मर्जीवर बससेवा सुरू असते. त्यामुळे एकाच वेळी दोन तीन बसेस धावतात. दोन तास बसचा पत्ताच नसतो. यावर आगार प्रमुखांचा बस चालक व बस वाहकावर अंकूश नाही.
खानापूर बस स्थानक पहाटेपासून विद्यार्थी, नोकरवर्गाची गर्दी दिसून येते मात्र बससेवा दिसत नाही.
लोकप्रतिनिधींनी या समस्यांकडे कधी गांभिर्याने पाहणार आहेत की नाही, अशी चर्चा खानापूर तालुक्यातून होताना दिसते आहे.
खानापूर-बेळगाव बसची संख्या वाढविणे गरजेचे आहे. कारण महाविद्यालयीन, विद्यार्थी वर्गाची संख्या दुप्पटीने वाढली आहे.
मात्र बसेसची संख्या आहे तेवढीच आहे. तेव्हा खानापूर-बेळगाव बससेवा सुरळीत व्हायची असेल तर बससंख्या वाढली पाहिजेत. तसेच वेळापत्रकाचेही पालन करणे आवश्यक आहे.
आगार प्रमुख केवळ निवेदन स्विकारतो
मात्र यावर तोडगा काढत नाही. त्यामुळे तालुक्यातील खेडेगावच्या नागरिकांनी प्रमुखाना निवेदन देऊन दमले आहेत. मात्र खानापूर तालुक्याची बससेवा कधी सुधारली नाही. जर यापुढे बससेवा सुरळीत चालू झाली नाही.
तर खानापूर बसस्थानकावर गेटबंद आदोलनाचा इशारा विद्यार्थी व नोकरवर्गाने दिला आहे.
