खानापूर : नागुर्डा (तालुका खानापूर) येथील श्री दुर्गादेवी नवरात्रोत्सव कमिटी नागुर्डा यांच्यावतीने सालाबादप्रमाणे १५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुर्गामाताची प्रतिष्ठाना करण्यात आली. सोमवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ रोजी श्रीमंत सरकार श्री. निरंजनसिंह उदयसिंह सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला.
अध्यक्ष म. ए. समिती खानापूर श्री. गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी, उद्योजक बसवराज होंदडकट्टी, पीकेपीएस संचालक अशोक पाटील, ज्योतिबा खांबले, बाळू बिर्जे, नारायण महाजन, किरण यळ्ळूरकर, सुरेश देसाई, कुमार थंगम, पंडित ओगले, पीडीओ प्रवीण सायनाक, नागुर्डा ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. पूजा चाळगुंडे, कृष्णाजी पाटील, मनोहर सुळेभावीकर, लक्ष्मण नांदुरकर, मुकुंद कांबळे, रमेश मादार, मनोहर बरुकर, दत्ताजी महाजन, मारूती धारवाडकर, राघोबा चापगावकर, दुर्गाप्पा महाजन इत्यादींच्या हस्ते विविध देवदेवतांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रारंभी ज्ञानेश्वर पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपस्थितांचे स्वागत परशराम महाजन, विनायक पाटील, विजय चापगावकर यांनी केले.
यावेळी कु. सोनाली ज्ञानेश्वर पाटील नागुर्डा हिने दहावी परीक्षेत ९८.४०% गुण घेऊन तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने तीचा सत्कार करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त जवान मारूती धारवाडकर, नागेश पाटील, शिवानंद धारवाडकर व सहदेव महाजन या भारतीय सैन्यातील सध्या सेवेत असलेल्या जवानांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांची दुर्गामाता नवरात्रोत्सव निमित्त भाषणे झाली. अध्यक्षीय भाषण श्रीमंत सरकार श्री. निरंजनसिंह सरदेसाई यांचे होऊन शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी नागुर्डा ग्रामपंचायत क्षेत्रातील बहूसंख्य नागरिक उपस्थित होते.