Thursday , October 10 2024
Breaking News

राज्यातल्या भाजप सरकारामुळे खानापूर तालुक्याचा विकास खुंटला

Spread the love

आमदार डॉ. अंजली निंबाळकरांचा आरोप
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका निसर्ग प्रधान तालुका आहे. मात्र तालुक्याच्या विकासासाठी राज्यातील भाजप सरकार कुचकामी ठरले आहे.
पहिल्यांदाच खानापूर तालुक्यात काँग्रेसच्या आमदारांनी 800 कोटी रूपयाचा निधी आणला असला तरी राज्यातील भाजप सरकार विकासाच्या बाबतीत झोपेचे सोंग घेतले आहे, असा आरोप काँग्रेसच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी सोमवारी दि. 6 रोजी आपल्या निवासस्थानी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत केला.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, नुकताच झालेल्या अवकाळी पावसामुळे खानापूर तालुक्यातील शेतकर्‍याची तीन हजार हेक्टरहून अधिक जमिनीतील भात पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. असे असताना भाजप सरकारने शेतकरीवर्गाला नुकसान भरपाई म्हणून गुंठ्याला केवळ 68 रूपये नुकसान भरपाई देत आहे. ही कर्नाटक राज्यातील भाजप सरकारकडून शेतकरीवर्गाची क्रुर चेष्टा केली जात आहे, असा आरोप केला.
खानापूर तालुक्याला हायटेक बसस्थानकासाठी निधी मंजुर करून भाजप सरकार झोपेचे सोंग घेत दिवस काढत आहेत.
तालुक्यात बससेवा, रस्ते, दवाखाने, शाळा इमारतीसाठी सरकारकडे सतत पाठपुरावा करत आहे. शेतकरी वर्गासाठी विविध फंडाची मागणी करत आहे. मात्र भाजप सरकारला यात रसच नाही. त्यामुळे भाजप सरकारमुळे खानापूर तालुक्यावर वाईट परिस्थिती आली आहे.
यावेळी आमदार म्हणाल्या की, सरकारच्या नाकर्तेपणामुळे रविवारी दि. 12 रोजी दुपारी 3 वाजता खानापूरातून संघर्ष पद यात्रेचे नियोजन करण्यात येणार आहे.
यावेळी खानापूरातून संघर्ष पदयात्रेला सुरूवात होऊन बरगाव, गर्लगुंजी, राजहंसगडमार्गे येळ्ळूरला संघर्ष पदयात्रा येणार. येथील चांगळेश्वर मंदिरात मुक्काम होऊन पहाटे पाच वाजता येळ्ळूर, वडगावहून येडियुराप्पा रोडमार्गे विधानसौधला पदयात्रा निघणार आहे. जवळपास 40 किलोमीटरहून अधिकअंतर पदयात्रा होणार आहे. या पदयात्रेत तालुक्यातील हजारहून अधिक जनता सहभागी होणार आहे. यासंघर्ष पदयात्रेतून खानापूर तालुक्यातील समस्यांचे निवेदन अधिवेशनात मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
येत्या अधिवेशानात खानापूर तालुक्यातील समस्या मांडून तालुक्याच्या शेतकरीवर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. असेही शेवटी त्यांनी सांगितले.

 

About Belgaum Varta

Check Also

गणेबैल टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन! बेकायदेशीर टोलनाका बंद करण्याची मागणी

Spread the love  खानापूर : गणेबैल येथील बेकायदेशीर उभारण्यात आलेला टोल नाका बंद करण्यात यावा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *