खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक शुक्रवार दिनांक १५ मार्च २०२४ रोजी सकाळी ठीक ११ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे बोलावण्यात आली आहे. यावेळी येत्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात म. ए. समितीच्या वतीने विचार विनिमय करून पुढील वाटचाल निर्धारित करायची आहे. तसेच कर्नाटक सरकारने दुकाने व आस्थापनांच्या फलकावर ६०% कन्नड भाषा वापरण्यासाठी कायदा केला आहे आणि उर्वरित ४०% मध्ये इतर भाषांचा वापर करण्यात यावा असा आदेश दिला आहे. त्या संदर्भात रस्त्यावरची लढाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभे करावयाचे आहे. तरी यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील व श्री. निरंजन सरदेसाई, सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी यांनी केले आहे.