खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचाराला मोठी गती मिळाली असून विविध भागात कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळण्यास सुरुवात केली आहे.
जोयडा तालुक्यातील बाळनी व कुंभारवाडा येथे सरदेसाई यांचा प्रचार करण्यात आला यावेळी परिसरात मोठ्या उत्साहाने उमेदवार सरदेसाई यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सरदेसाई यांनी कारवार लोकसभा मतदार संघात पहिल्यांदाच समितीने उमेदवार दिला आहे. त्यामुळे त्यामुळे मराठा समाज आणि मराठी भाषिकांना पर्याय मिळाला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी देखील साथ द्यावी आणि पुन्हा एकदा या भागात मराठीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले. यावेळी या भागातील नागरिकांनी बेळगाव खानापूर प्रमाणे कारवार आणि इतर भागात कन्नड सक्ती मोठ्या प्रमाणात केली जात आहे त्याचा फटका सहन करावा लागत आहे आपली संस्कृती टिकवण्यासाठी लढा दिला तरच आपण टिकणार आहोत याची जाणीव सर्वांनी करून घेतली पाहिजे असे मत व्यक्त करीत समितीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून स्वतःहून आपल्या भागात प्रचार केला जाईल असे आश्वासन दिले आहे.
प्रारंभी खानापूर तालुका समितीचे उपाध्यक्ष रमेश धबाले यांनी प्रास्ताविक करताना खानापूर तालुक्याला लागून असलेल्या हलियाळ व सुपर जोयडा कारभार भागात मराठी भाषिक व मराठा समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या भागातील नागरिकांनी समितीच्या पाठीशी उभे राहावे आणि आपल्या समस्या सोडवून घेण्यासह आपली भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे मत व्यक्त केले.
उदय नाईक, सुधाकर नाईक, रमाकांत नाईक, विष्णू नाईक, शंकर नाईक, उल्हास नाईक, शंकर नाईक, बाबू गावकर, सतीश मिराशी, शिवाजी राणे, सुरेश गावकर, गौतम राणे, नागेश भोसले, प्रभू इतर कार्यकर्ते उपस्थित होते.