खानापूर (प्रतिनिधी) : मास्केनट्टीत (ता.खानापूर) येथील जानु विठ्ठल जंगले (वय १८) याचा मास्केनट्टी गावापासुन जवळ असलेल्या अमृत गावडा तळ्यात रविवारी दि. १९ रोजी दुपारी पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मास्केनट्टी गावचा युवक जानु विठ्ठल जंगले मानसिक दृष्ट्या कुमकवत होता. तो अचानक तळ्याकडे गेल्याने तो तळ्यात पडला असावा. तसेच तळ्याच्या काठावर त्याचे चप्पल दिसून आल्याने तो तळ्यात पडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
त्याच्या पश्चात आई, वडील भाऊ असा परिवार आहे. जानु हा मागील वर्षी दहावी उत्तीर्ण झाला होता.
