खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटकाची राजधानी बेंगळुर येथे छत्रपती शिवरायांच्या मुर्तीची विटंबना करून महाराजांचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ रविवारी दि. १९ रोजी खानापूर बंदची हाक दिली होती. यावेळी सकाळी आठ वाजल्यापासून शहरातील दुकाने व्यापारी वर्गाने बंद करून पाठींबा दर्शविला. येथील महालक्ष्मी मंदिराच्या आवारात तालुक्यातील सर्वपक्षिय संघटनांनी बंदच्या निषेधार्थ शहरातुन फेरी काढण्यात आली.
यावेळी लक्ष्मी मंदिर, शिवस्मार चौक, पणजी बेळगाव महामार्गावरून जांबोटी क्राॅसवरून पारीश्वाड क्राॅसवरून बाजारपेठ चिरमुरकर गल्लीतुन लक्ष्मी मंदिरात फेरीची सागंता केली.
फेरीमध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा, वीर संगाळी रायण्णाची प्रतिमा, भगवा ध्वज घेऊन घेऊन शिवभक्त सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना भाजपचे नेते विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की, बेंगळुरू येथे राज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात छत्रपती शिवरायांच्या मुर्तीची विटंबना होते. हा शिवरायांचा अवमान आहे. अशा वाईट कृत्य करणाऱ्यावर कडक शासन झाले पाहिजे. त्याचा मी निषेध करतो.
याच बरोबर बेळगाव येथील धर्मवीर संभाजी चौकात निषेध करण्यासाठी उपस्थित असलेल्या रमाकांत कोंडुस्कर, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, शिवाजी सुंठकर आदीसह बऱ्याच युवकांना पोलिसाना झेलमध्ये डांबले. त्यांची वेळीच सुटका करावी.
त्याचबरोबर खानापूर तालुका माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनीही खानापूर येथील लक्ष्मी मंदिरात निषेध सभेत बोलताना म्हणाले की, शिवराय हे हिंदू धर्माचे अराध्य दैवत असुन आठरा पगड जातीचे ही दैवत मानले जाते.
अशा शिवारायाच्या मुर्तीवर काळा रंग ओतल्याने हिंदूंच्या भावना दुखवल्या आहे. सर्वत्र संतापाची लाट उसळलेली आहे. अशा वाईट कृत्य करणाऱ्याचा मी निषेध करतो. यावेळी भाजपचे युवा नेते पंडित ओगले यांनी बंद यशस्वी करण्यासाठी विविध सर्वपक्षीय नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मोठे सहकार्य केले याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच खानापूर तालुका भाजप अध्यक्ष संजय कुंबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, खानापूर नगरपंचायत स्थायी समिती अध्यक्ष लक्ष्मण मादार, आदीनी शिवरायांच्या मुर्तीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.
बंदमध्ये ऍड. अरूण सरदेसाई, नगराध्यक्ष मजहर खानापूरी, कर्नाटक राज्य शिवसेना उपाध्यक्ष के. पी. पाटील, रवि काडगी, जाॅर्डन गोन्सालवीस, प्रतिक देसाई, नगरसेवक प्रकाश बैलूरकर, यशवंत गावडे, ऍड. अथनीकर, बाळू चिनवाल, नितीन गावडे, आदीसह खानापूर शहरासह तालुक्यातील शिवप्रेमी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांना सर्वपक्षीय नेत्यांनी बंदच्या निषेधार्थ, विटंबन केलेल्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन सादर केले.