बेळगाव : येथील शतकमहोत्सवी साप्ताहिक राष्ट्रवीर यांच्या वतीने संस्थापक संपादक शामराव देसाई यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना गौरविण्यात आले २५ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, घोंगडी असे पुरस्काराचे स्वरूप आहे. रुईकर कॉलनी येथील निवासस्थानीच झालेल्या छोटेखानी पुरस्कार सोहळ्यात लढवय्या नेत्यांसोबतच्या आठवणी जाग्या केल्याने भावूकतेची किनार लाभली. बेळगाव येथील राष्ट्रवीर हे १०० वर्षांपूर्वीचे साप्ताहिक आहे. गेल्या चार वर्षापासून या साप्ताहिकाने शामराव देसाई यांच्या स्मृती जपण्यासाठी पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे. या पुरस्कार निवडीसाठी समितीचे अध्यक्षपद डॉ. जयसिंगराव पवार यांच्याकडे आहे. या समितीने यावर्षीच्या पुरस्कारासाठी सन्मानित एन. डी. पाटील यांची निवड केली. आजारी असल्याने रुईकर कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानीच जाऊन पुरस्कार देण्यात आला. सरोज पाटील यांच्या उपस्थितीत पुरस्कार स्वीकारला. जयसिंगराव पवार, राजाभाऊ पाटील, प्राचार्य टी. एस. पाटील, शिवाजी देसाई यांनी मनोगत मांडताना एन. डी. यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी पुरस्कार समितीतील तुकाराम बँक अध्यक्ष प्रकाश मरगाळे, दीपक देसाई, अनंतराव देसाई, विक्रम पाटील, आनंद पाटील, नारायण खांडेकर, अंजली साळवे, प्राचार्य सुनीलकुमार लवटे, प्राचार्य जी. पी. माळी, संभाजी जगदाळे, कुमार जाधव आदी उपस्थित होते.
पाचवा पुरस्कार पन्नालाल सुराणा यांना जाहीर
ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा हे या पुरस्काराचे पाचवे मानकरी म्हणून निवडण्यात आले आहेत, पुढील महिन्यात कोल्हापुरात जाहीर कार्यक्रमात त्यांना पुरस्काराने गौरवले जाणार आहे.
Check Also
आम. असिफ सेठ यांची विविध वसतिगृहांना भेट
Spread the love बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आज …