बेळगाव : बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे झालेल्या विटंबनेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथील मराठा समाज व शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्यावतीने बेळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिषेक घालून पूजन करण्यात आले
छत्रपती शिवाजी महाराज हे ठराविक जाती-धर्माचे नसून सकल भारतीयांचे श्रद्धास्थान आहेत त्यांची विटंबना म्हणजे भारतीय संस्कृतीचा अपमान आहे, असे मत मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी व्यक्त केला. महाराजांचा जयजयकार करत शिवप्रेमींनी बेंगळुरू येथील घटनेचा तीव्र निषेध केला. याप्रसंगी मराठा समाजाचे गुणवंत पाटील, किरण जाधव, शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस जे. बी. शहापूरकर, मदन बामणे, गणेश दड्डीकर, रवी निर्माळकर, राष्ट्रीय हिंदू सेनाचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर सह अन्य शिवभक्त शिवप्रेमी उपस्थित होते.