खानापूर (प्रतिनिधी) : हेब्बाळ (ता. खानापूर) गावची मुलगी व गणेबैल गावची सुन श्रीमती लक्ष्मी मल्हारी गेजपतकर (वय 34) हिचा हेब्बाळच्या डॅममध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि. 20 रोजी घडली.
हेब्बाळ येथील मारूती कल्लापा गुरव यांची कन्या असून तिचे सासर गणेबैल आहे. तिच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली.
यावेळी माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन विचारपूस केली.
या घटनेमुळे हेब्बाळ तसेच गणेबैल गावात दु:खाचे सावट पसरले आहे. नंदगड पोलिस पुढील तपास करत आहेत. सदर महिला मानसिक त्रस्त होती. यासाठी तिला माहेरी उपचारासाठी आणले होते. तिच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी सकाळी उठून हेब्बाळच्या डॅममध्ये उडी घेऊन आपले जीवन संपविले.
Belgaum Varta Belgaum Varta