Wednesday , March 4 2026
Breaking News

मणतूर्गे येथे ग्रामदैवत रवळनाथ मंदिर बांधकामास शुभारंभ

Spread the love

 

खानापूर : सोमवार दिनांक एक जुलै रोजी मणतूर्गे येथे ग्रामदैवत रवळनाथ मंदिर बांधकाम शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे वतनदार पाटील नागेश विठ्ठल पाटील हे होते. यावेळी रवळनाथ पूजन मंदिराचे पुजारी नूतन देवाप्पा गुरव यांच्या हस्ते करण्यात आले तर गणेश पूजन नारायण कल्लाप्पा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन एएसआय रवींद्र तुकाराम गुंडपिकर, जिल्हा आदर्श शिक्षक नागेश देवकरी, जिल्हा आदर्श शिक्षक शिवाजी गावडे, मारुती देवकरी, विठ्ठल रुक्माई को-ऑप. सोसायटी मणतूर्गे संचालक सुराप्पा पाटील, पोस्टमन चंद्रकांत देवकरी, निवृत्त बीएसएनएल कर्मचारी गोवा विलास राऊत, रमाकांत घाडी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब शेलार म्हणाले की, आजपर्यंत गावकऱ्यांनी मंदिर बांधकामासाठी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. यापुढे देखील गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे मंदिर बांधकाम कमिटीच्या पाठीशी राहून मंदिर पूर्णत्वास नेण्यास सहकार्य करावे.
कार्यक्रमाला जीर्णोद्धार कमिटी अध्यक्ष, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते आबासाहेब दळवी, सेक्रेटरी प्रकाश नारायण गुरव, खजिनदार शांताराम पाटील, सदस्य मल्लाप्पा देवलतकर, प्रकाश पाटील, दत्तू पाटील, नामदेव गुरव, प्रभाकर बोबाटे, मऱ्याप्पा देवकरी, बळवंत देसाई, दीपक पाटील, विजय भटवाडकर आदी मंदिर जीर्णोद्धार कमिटी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाला रामचंद्र मऱ्याप्पा पाटील, गोपाळ गुंडू पाटील, राजाराम अमृत पाटील, लक्ष्मण नारायण भटवाडकर, परशुराम मंगेश बोबाटे, पांडुरंग देसाई, त्यानंतर हरि पाटील यांच्यासह गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते. रवळनाथ मंदिर बांधकामासाठी रवींद्र गुंडपिकर, आबासाहेब दळवी, विलास राऊत यांनी प्रत्येकी 11 हजार रुपये देणगी दिली तर जिल्हा आदर्श शिक्षक मारुती देवकरी, नागेश देवकरी, नामदेव गुरव, नागेश विठ्ठल पाटील यांनी प्रत्येकी 5000 रुपये देणगी दिली. नारायण कल्लाप्पा पाटील, सुराप्पा पाटील, शिवाजी गावडे, यांनी प्रत्येकी एक हजार एक रुपये देणगी दिली. त्याचबरोबर गावातील बहुसंख्य दानशूर व्यक्तींनी देखील मंदिर बांधकामासाठी देणग्या जाहीर केल्या आहेत.
सूत्रसंचालन आबासाहेब दळवी यांनी केले. कार्यक्रमाला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Spread the love  खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *