खानापूर (वार्ता) : तिवोली (ता. खानापूर) येथील युवकाचा खानापूर-जांबोटी रस्त्यावरील शुभम गार्डनजवळ ओमीनी व स्कूटी याची समोरासमोर जोराची धडक बसल्याने स्कूटी चालक राजू पिटर सोज (वय 34) याचा मृत्यू झाला.
याबाबत खानापूर पोलीस स्थानकातून मिळालेली माहिती अशी की, तिवोली (ता. खानापूर) युवक राजू पिटर सोज हा गोव्यात नोकरीला होता. बुधवारी दि. 22 रोजी तो सकाळी गोव्याला जाण्यासाठी खानापूर-जांबोटी रस्त्याने जात होता. खानापूरपासून जवळ असलेल्या रामगरवाडीजवळील शुभम गार्डनजवळ समोरून खानापूरच्या दिशेने जाणार्या ओमीनी वाहनाची समोरून जोराची धडक बसली. त्यात राजू सोज हा रक्ताच्या थारोळ्यात पडला. लागलीच त्याला उपचारासाठी बेळगाव येथील केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिस पुढील तपास करत आहेत.
राजू सोज याच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे.
Check Also
टेनिस हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी मराठा मंडळ ताराराणी कॉलेजच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय निवड
Spread the love खानापूर : मराठा मंडळ ही शिक्षण संस्था क्रीडा स्पर्धेत खेळाडू विद्यार्थ्यांना नेहमीच …