Wednesday , May 29 2024
Breaking News

बाजारपेठेतील दुकाने नाताळसाठी सजली!

Spread the love

नागरिक, व्यावसायिकांमध्ये उत्साह : टोप्या, ड्रेसची रेलचेल
निपाणी (वार्ता) : ख्रिस्ती बांधवांचा नाताळ सण शनिवारी (ता. 25) डिसेंबर रोजी साजरा करण्यात होणार आहे. त्या निमित्ताने लागणार्‍या विविध वस्तू निपाणी बाजारात विक्रीस आल्या आहेत. दिवाळीनंतर आता नाताळसाठी बाजारपेठ सजली आहे.
शहरात दोन लहान चर्च आहेत. नाताळ निमित्ताने चर्चची रंगरंगोटी, सुशोभीकरण सुरू झाले आहे. सांताक्लॉजचे मुखवटे, सांताक्लॉज, टोप्या, चांदण्या, ख्रिसमस ट्री तसेच इलेक्ट्रॉनिक्स तोरण, रंगबेरंगी मेणबत्या विक्रीस उपलब्ध आहेत. नाताळच्यानिमित्ताने आतापासूनच पालक आपल्या मुलांसाठी भेटवस्तू खरेदी करून ठेवत आहेत. घड्याळे, खेळणी, कपडे, शिवाय विविध प्रकारची देशी-विदेशी चॉकलेट्स बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. नाताळ सणासाठी खास ’केक’ला मागणी असते. ख्रिसमससाठी विविध स्वादाचे केक, पेस्ट्रीज कुकिजचे बुकिंग बेकरी, मिठाई विक्रेते घेत आहेत. याशिवाय मिठाईनाही मागणी वाढली आहे. नाताळमुळे काही केक विक्रेत्यांनी ’एक केक खरेदीवर दुसरा केक फ्री’ अशी ऑफर लावली आहे. नाताळमध्ये ख्रिस्त बांधव घरासमोर चांदण्या लावत असून विद्युत रोषणाई करतात. विद्युत रोषणाई केल्यामुळे ख्रिसमस ट्री आकर्षक दिसतो. त्या अनुषंगाने खरेदी सुरू आहे. बाजारात लगबग वाढली असली, तरी कोरोना नियमांचे पालन केले जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

वादळी वारे, पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना ‘अरिहंत’तर्फे भरपाईचे धनादेश

Spread the love  निपाणी (वार्ता) : वादळी वारे आणि पावसामुळे शहरांसह परिसरातील अनेक घरासह नागरिकांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *