खानापूर ब्लॉक काँग्रेसची मागणी
खानापूर : पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या वारकत्यांच्या गाड्यांना टोल माफी देण्यात यावी, यासाठी गणेबैल टोल नाक्यावर खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रात वारकऱ्यांना वारीसाठी जाता-येता संपूर्ण टोलमाफी आहे त्याच धर्तीवर गणेबैल टोल नाक्यावर सुद्धा वारकऱ्यांना माफी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यासंदर्भात टोल नाक्याचे मॅनेजर मंजूनाथ बागेवाडी यांनी सकारात्मक भूमिका घेऊन सहकार्य करण्याचे मान्य केले असून वारकऱ्यांनी खानापूरहून जाताना २ नंबरच्या लेन मधून गाड्या घेऊन जावे तसेच परत येताना ९ नंबरच्या लेन मधून यावे त्याचबरोबर वारकऱ्यांची आपल्या वाहनांवर भगव्या पताका लावावे.
निवेदन देतेवेळी महादेव कोळी, ॲड. ईश्वर घाडी, महांतेश राऊत, प्रसाद पाटील, जोतीबा गुरव, दिपक कवठनकर, तोहीद, सुर्यकांत कुलकर्णी, बबन सोझ (वाटरे), ईश्वर बोबाटे, रामा गुरव, म्हात्रू गुरव, महेश गुरव, लक्ष्मण पाखरे, सातेरी गुरव तसेच सावित्री मादार, गीता आंबरगट्टी, वैष्णवी पाटील, दिपा पाटील, सखुबाई पाटील, दिपाश्री पाटील उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta