खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील भुरूनकी ग्राम पंचायत हद्दीतील मास्केनट्टीतील जाणू विठ्ठल जंगले (वय 22) याचा रविवारी दि. 19 रोजी गावापासून जवळ असलेल्या अमृत गावडा तळ्यात पडून मृत्यू झाला. ही बातमी समजताच खानापूर तालुका भाजपा प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांनी मास्केनट्टीतील जंगले कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच नियती फाऊंडेशनच्या वतीने जंगले कुटुंबाना आर्थिक मदत देऊ केली.
यावेळी झालेल्या दुर्घटनेबदल दु:ख व्यक्त केले व कुटुंबाला धीर दिले.
भेटीप्रसंगी बसवराज कडेमनी, ईश्वर सानिकोप, कुश आंबोजी, नागेश रामजी, प्रविण पाटील, अरूण परसन्नावर, संतोष कुरबर, महेश गुरव, रूद्रेश भेंडीगीरी, संदिप तिप्पनावर, तसेच गावचे नागरिक उपस्थित होते.
