खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका हा अतिदुर्गम व मागासलेला तालुका म्हणून परिचित आहे. कर्नाटक राज्यातील सर्वात मागासलेला शिक्षणाच्या सोयीपासून वंचित राहिलेला तालुका म्हणजे खानापूर तालुका अशी ओळख आहे.
नुकताच बेळगावात झालेल्या अधिवेशनासाठी आलेल्या शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी खानापूर तालुक्यातील मागासलेल्या दुर्गमभागातील शाळांचा दौरा करताना जांबोटी येथील मराठी प्राथमिक शाळा तसेच कन्नड प्राथमिक शाळाना भेट दिली.
येथील शाळाची दुरास्था पाहिली. शिक्षण मंत्र्यांनी जांबोटी कन्नड शाळेतील वर्गातील मुलांशी संवाद साधला. यावेळी मुलांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. शिक्षकांची कमतरता त्यांना दिसून आली व शिक्षकांची उणीव भरून का़ढू, असे सांगितले.य यावेळी आमदार अंजली निंबाळकर, शिक्षण सचिव एस. एस. बिरादार, जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. ए. बी. पुंडलिक, डायेट प्राचार्य एम. एम. सिंदूर, बीईओ लक्ष्मणराव यकुंडी, शाळेचे मुख्याध्यापक एस. एम. चिकोडी, शिक्षकवर्ग, पालकवर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.
Check Also
लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात चोरी!
Spread the loveखानापूर : खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात काल रात्री चोरी झाली असून …