लेफ्टनंट रोहित कामत : मोहनलाल दोशी विद्यालयात सत्कार
निपाणी (वार्ता) : शाळेने सर्वार्थाने मला घडवले. भारतीय सैन्यदलामध्ये यापुढे प्रामाणिकपणे सेवा करून शाळेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करणार आहे. सैन्यात आपण जरी लेफ्टनंट असलो तरी शाळेसाठी कायमपणे रोहित कामतच असणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून कष्ट, जिद्द या जोरावर मोठे ध्येय समोर ठेवून ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करावेत. यशापयशाची भीती न बाळगता सातत्याने प्रयत्न करा. प्रामाणिक प्रयत्न करणार्यांना यश नक्कीच मिळते, असे मत लेफ्टनंट प्रदीप कामत यांनी व्यक्त केले. मोहनलाल दोशी विद्यालय अर्जुनगर (ता. कागल)येथे माजी विद्यार्थी मंडळाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्याध्यापिका पी. एन. पाटील यांच्या हस्ते रोप आणि ग्रंथभेट देऊन तर माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने शाल, सन्मानचिन्ह देऊन माजी विद्यार्थी बी. जी. माने, वैभव चव्हाण, संजय वारके, पी. एम. कुराडे, सज्जन कांबळे, आकाश कोळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लेफ्टनंट रोहित यांच्या आई शुभांगी, वडील प्रदीप यांचाही सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर पर्यवेक्षक बी. एस. जाधव, संदीप कामत, शिक्षक प्रतिनिधी आर. डी. पाटील, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी बी. डी. यादव उपस्थित होते.
मुख्याध्यापिका सौ. पी. एन. पाटील यांनी, रोहित याचे अभिनंदन करून यापुढेही मोठमोठ्या पदावरती काम करून आपल्या कर्तबगारीने शाळेचे नाव उज्ज्वल करावे अशा शुभेच्छा दिल्या. पर्यवेक्षक बी. एस. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थी मंडळाचे सचिव रमेश देसाई यांनी प्रास्ताविक केले. एस. एस. सांडगे यांनी आभार मानले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Check Also
निपाणीत पारंपरिक पद्धतीने विजयादशमी
Spread the love आमराई रेणुका मंदिरांत गर्दी; शमी पूजनासह विविध धार्मिक कार्यक्रम निपाणी (वार्ता) : …