गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते वितरण : सामाजिक कार्याची दखल
निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनवतीने देण्यात येणारा मानाचा राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा ’प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवार्ड 2021’ निपाणीचे प्रसिध्द रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांना जाहीर झाला आहे. गुरुवारी (ता. 30) या पुरस्काराचे वितरण गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी पद्मश्री विनायक खेडेकर यांचीही यावेळी मुख्य उपस्थिती असणार आहे. रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांनी शुभरत्न केंद्र निपाणीच्या माध्यमातून हजारो नागरिकांना समस्यामुक्त केले आहे. कोणत्याही क्षेत्रातील समस्येवर ते अचूक रत्न देऊन नागरिकांना त्यांच्या समस्यापासून मुक्त करतात. या कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला हे प्रसिद्ध रत्नशास्त्री एच. ए. मोतीवाला यांचा वारसा चालवत आहेत. ते पाचव्या पिढीचे वारसदार आहेत. दिवंगत रत्नशास्त्री एच. ए. मोतीवाला यांनी स्थापन केलेल्या केंद्राचे सर्वेसर्वा म्हणून ए. एच. मोतीवाला परिचित आहेत. वडिल एच. ए. मोतीवाला यांनी दिलेली हस्तशास्त्र व चेहराशास्त्राची विद्या त्यांनी आत्मसात केली. वडीलांच्याप्रमाणेच या व्यवसायात त्यांनी विश्वास कमावला आहे. म्हणूनच रत्नशात्री ए. एच. मोतीवाला यांच्याकडे गोवा, कोकण, कर्नाटक, महाराष्ट्र , गुजरातसह अन्य राज्यातून लोक समस्या घेऊन येत असतात. ए. एच. मोतीवाला हे हस्तशास्त्र व चेहरा शास्त्रानुसार संबंधित समस्या पिडीताना मार्गदर्शन करून अचूक रत्न देतात.
ए. एच. मोतीवाला यांनी आपले सामाजिक कार्य सुरुच ठेवले आहे. कोरोना काळात गरिबांना मोफत अन्नधान्य देण्यापासून अनेकांना त्यांनी मदत केली आहे. त्यांच्या व्यवसायातील यशाची दखल घेत हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. शुभरत्न केंद्र हे व्यवसायाचे नाही तर गरीब, समस्यांनी गुरफटलेल्या लोकांचे आशास्थान बनले आहे. यामध्ये ए. एच. मोतीवाला यांचा मोलाचा वाटा आहे. यामुळे यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.