लोंढा : शेतात निघालेल्या वृद्ध शेतकऱ्यावर तीन अस्वलानी पाठीमागून हल्ला केला. अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला असून त्याने धाडसाने दगड मारून अस्वलाच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. लोंढा येथे सदर घटना घडली. दगडाने मारल्यामुळे तीन अस्वले शेतकऱ्याला सोडून पळून गेली.
सकाळी नेहमी प्रमाणे प्रभू शिनुटगेकर हे आपल्या शेताकडे निघाले होते. त्यांच्या शेताला जाण्याच्या मार्गावर जंगल आहे. जंगलातून आलेल्या तीन अस्वलांनी अचानक शेतकऱ्यावर हल्ला केल्याची माहिती त्यांनी गावात येऊन दिली.
शेतकऱ्याला बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अस्वलाच्या हल्ल्याचे वृत्त कळताच वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी प्रभू शिनुटगेकर यांची भेट घेऊन माहिती जाणून घेतली.
Belgaum Varta Belgaum Varta