Wednesday , October 16 2024
Breaking News

बैलाच्या हल्ल्यात तिवोलीचा शेतकरी गंभीर जखमी

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : तिवोलीतील (ता.खानापूर) गावचा शेतकरी दिनकर लाटगावकर (महाराज) यांना गुरूवार दि. ३० डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास बैलाने पायाला शिंगाने गंभीर जखमी केले असुन रक्त प्रवाह जास्त प्रमाणात झाला. याची माहिती माजी आमदार व डीसीसी बँक संचालक अरविंद पाटील व भाजपा युवा नेते पंडित ओगले यांना देण्यात आली असता माजी आमदार अरविंद पाटील यांनी ताबडतोब सरकारी दवाखान्यात फोन करून तिवोली गावाला एँम्बुलन्स पाठविली व जखमीला खानापूर सरकारी दवाखान्यात दाखल करण्यास सांगितले व लागलीच माजी आमदार अरविंद पाटील व पंडित ओगले प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांसह हजर राहिले व जखमीची आपुलकीने विचारपुस करून जखमीला व त्यांच्या नातेवाईकांना धीर दिला व डॉक्टरांशी चर्चा करून जखमीवर प्रथमोपचार करण्यास सांगुन पुढील उपचारासाठी बेळगाव येथील जिल्हा सरकारी दवाखान्यात पाठविले, जखमीची प्रकृती स्थिर असुन काही काळजी करण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरनी सांगितले आहे. यावेळी तिवोली गावातील नागरिकांनी तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शिरोली येथील बेकायदेशीर वृक्षतोडी प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा; डॉ. अंजली निंबाळकर यांचे वनमंत्री ईश्वर खंड्रे यांना निवेदन

Spread the loveखानापूर : खानापूर तालुक्यातील शिरोली येथील सर्वे नंबर 97 मध्ये खासगी जमिनीत बेकायदेशीररित्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *