बेळगाव: ऑनलाईन प्रणालीद्वारे करदात्यांना अर्ज करताना किंवा रिटर्न फाईल करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या समस्यांचे निवारण करण्यासाठी करदात्यांसाठी शहरातील जीएसटी व्यावसायिक कर कार्यालयांमध्ये सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन काल गुरुवारी झाले.
क्लब रोड येथील व्यवसायिक कर कार्यालयांमध्ये करदात्यांसाठी सेवा केंद्राची सुरुवात करण्यात आली असून या सेवा केंद्राचे उद्घाटन काल गुरुवारी करण्यात आले. याप्रसंगी बोलताना केंद्रीय कर विभागाचे मुख्य आयुक्त बसवराज नलगावे यांनी ऑनलाईनद्वारे करदात्यांना अर्ज करताना किंवा रिटर्न फाईल करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.
ऑनलाईन कर प्रणालीतील त्रुटींबाबत कर दातांच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत त्या सोडविण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यात येत असून लवकरच या त्रुटींचे निवारण होईल असे सांगून
आता करताना कोणत्याही अडचणी आल्यास या सेवा केंद्रामार्फत त्या सोडवण्यात येतील. त्यामुळे टॅक्स कन्सल्टंट व करदात्याने याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त बसवराज नलगावे यांनी केले.
प्रारंभी आयुक्त बसवराज नलगावे आणि बेळगाव ट्रेडर्स फोरमचे ज्येष्ठ सदस्य शेवंतीलाल शहा यांच्या हस्ते फीत कापून सेवा केंद्राचे उद्घाटन झाले. याप्रसंगी बेळगाव ट्रेडर्स फोरमचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर, कर विभागाचे सहआयुक्त रामाराव यांच्यासह कर सल्लागार, करदाते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.