बेळगांव : टिळकवाडी शाळेचे क्रीडा शिक्षक विवेकानंद वैजनाथ पाटील यांचा सत्कार करण्यात आला. संतमीरा शाळेच्या माधव सभागृहात नुकत्याच झालेल्या शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धेत दरम्यान खासदार मंगला अंगडी संतमीरा शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, मनपा उपायुक्त भाग्यश्री हुग्गी, माधुरी जाधव, आनंद सोमनाचे, राजेश लोहार, संतमीरा शाळेचे प्रशासन राघवेंद्र कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव या मान्यवरांच्या हस्ते विवेक पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. मागील 30 वर्षे पासून ठळकवाडी शाळेत क्रीडाशिक्षक म्हणून कार्यरत असलेले विवेक पाटील हे 4 वेळा यूनिव्हर्सिटी ब्लू किताब वर्ग-3 व राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व केले आहेत. आपल्या शालेय कारकिर्दीत त्यांनी क्रिकेट, खो-खो, थ्रोबॉल, कबड्डी, फुटबॉल या खेळातून जिल्ह्याला अनेक राज्य व राष्ट्रीय खेळाडू निर्माण केले आहे याची दखल घेऊन संतमीरा शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला होता.
