खानापूर : कोलकाता येथील आर जी. कार वैद्यकीय विज्ञान महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टरच्या हत्येप्रकरणी खानापूर तालुका डॉक्टर संघटनेच्या वतीने मोर्चाद्वारे निवेदन देण्यात आले.
नुकताच कोलकाता येथील निवासी महिला डॉक्टरची अत्याचार करून अमानुष हत्या करण्यात आली या निषेधार्थ खानापूर तालुका डॉक्टर संघटनेने शनिवार दि.17 ऑगस्ट रोजी खानापूर शहरातून निषेध मोर्चा काढून खानापूर तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. नाडगौडा म्हणाले की, कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय विज्ञान महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्यात आली असल्याची घटना नुकताच घडली आहे. सदर नराधामाला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी.
निवेदनात म्हटले आहे की, देशात एकीकडे बेटी बचाव बेटी पाढाओ नारा देण्यात येत असतानाच देशात ठिकठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहेत. यासाठी देशात कठोर कायदा करण्यात यावा जेणेकरून अश्या दुशकृत्याना आळा बसेल व मयत डॉक्टरला न्याय मिळेल त्याचप्रमाणे पीडितेच्या कुटुंबाला योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी व सर्व रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे.
खानापूर उपतहसीलदारांनी सदर निवेदनाचा स्वीकार केला. यावेळी उपस्थित सर्व डॉक्टरानी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. निवेदन देण्यात आल्यानंतर खानापूर तालुका डॉक्टर संघटनेतर्फे शनिवारी बाह्य रुग्ण विभाग व बिगर आपत्कालीन डॉक्टरांचे काम बंद आंदोलन सुरू ठेवण्यात आले. फक्त आपत्कालीन सेवा चालू होत्या. त्यावेळी डॉक्टर मोहन कुंभार, डॉक्टर शेखर पाटील, डॉक्टर किरण लाड, डॉक्टर फैयाज कित्तूर, डॉक्टर सुदर्शन सुळकर, डॉक्टर एन एल कदम, डॉक्टर मधु कुंभार, डॉक्टर बीबी वाठारे, डॉक्टर पी एन पाटील, डॉक्टर पिके धवलकर, डॉक्टर किरण पाटील, डॉक्टर सागर चिट्टी यांच्यासह इतर डॉक्टर उपस्थित होते.