खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा वीट व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. खानापूर तालुक्यातील वीट बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे याभागातील गर्लगुंजी, इदलहोंड, सिंगीनकोप, गणेबैल, अंकलेसह नंदगड, हेब्बाळ, शिवोली, चापगाव अशा विविध भागात वीट व्यवसाय मोठ्याप्रमाणात चालतो. यासाठी डिसेंबर ते एप्रिलपर्यंत वीट व्यवसाय केला जातो.
परंतु यंदा अवकळी पाऊस डिसेंबरपर्यंत झाला. त्यामुळे जमिनीत ओलावा असल्याने यंदा वीट व्यवसाय प्रारंभाला उशीर झाला.
सध्या तालुक्यात वीट व्यवसायाला सुरुवात झाली असुन सिंगीनकोप भागात बीडी, भरूनकी, कक्केरी, मास्केनटी आदी भागातील वीटभट्टी मजूर येऊन कामाला लागलेत.
हे वीट मजुर आपल्या कुटुंबाला, जनावरांना सोबत घेऊन शिवारात तंबू ठोकून वास्तव्यास राहतात. त्यामुळे त्याच्या शाळकरी मुलाना तंबू शाळा, अथवा जवळच्या शाळेत दाखल व्हावे लागते. जवळ पास पाच ते सहा महिने विद्यार्थी आपल्या मुळ शाळेपासुन दुर राहतात.
वीट कामगार पहाटे पासुन वीट तयार करण्यात दंग असतात. एक जोडी दिवसाला हजार ते बाराशे वीटा मारतात.
त्यामुळे एक कुटूंब ८० हजार ते एक लाख कच्चा वीट मारून देतात.तर कच्चा वीटा मारण्यासाठी एक हजार वीटाना बाराशे ते तेराशे मजुरी दिली जाते. तर वीटभट्टीसाठी जळाऊ लाकूड ३ ते ४ हजार रूपये टन, भूसा १० ते १२ एक ट्रिपर, भाताची पोल आदी कच्चा माल विकत घ्यावा लागतो.
सध्या बाजारात तयार वीट पाच ते सहा हजार रूपये एक हजार वीट विकली जाते. परंतु कोरोना काळात वीट व्यवसाय मंदावला आहे. त्यातच लोखंड, सिमेंटचा दर भडकला आहे. बांधकाम व्यवसाय मंदावला त्यामुळे वीटाची उचल होत नाही. अशी माहिती गर्लगुंजीचे वीट व्यवसायीक व ग्राम पंचायत सदस्य परशराम चौगुले यांनी बोलताना सांगितले.
तसेच यंदा अवकाळी पावसामुळे वीट व्यवसायाला विलंब होत आहे. तर मागील वर्षीच्या वीटा शिल्लक असल्याने जुन्या वीटा अजुन आहेत. मात्र वीटाना दर मिळत नाही. अशी खंत वीट व्यावसायिक हणमंत मेलगे यांनीही बोलताना व्यक्त केली.