Tuesday , April 23 2024
Breaking News

यमकनमर्डीत भिमाकोरेगांव विजयोत्सव : उमेश भिमगोळ

Spread the love

संकेश्वर (प्रतिनिधी) : येत्या ३ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ३ वाजता यमकनमर्डी येथे भिमाकोरेगांव विजयोत्सव आणि सावित्रीबाई फुले जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यमकनमर्डीचे दलितनेते उमेश भिमगोळ यांनी आज सायंकाळी विश्रामधाम येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले कार्यक्रमाला जेवरगी सिध्द बसव कबीर स्वामीजींचे दिव्य सानिध्य लाभणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी मंत्री व यमकनमर्डीचे विद्यमान आमदार सतीश जारकीहोळी भूषविणार आहेत. कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक विठ्ठल लग्न यांचे व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाचे नेतृत्व उमेश भिमगोळ अर्थात माझ्याकडे सोपविण्यात आले आहे.
यमकनमर्डीत भागात दलितशोषित जनसंख्या जादा असून आमचे लाडके नेते माजी मंत्री व विद्यमान आमदार सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली समाज बांधवांना संघटीत करुन त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य केले जात आहे. गेली २०४ वर्षे झाली पूणे येथील कोरेगाव येथे भिमाकोरेगांव विजयोत्सव कार्यक्रम होत आहे. तेथे सर्वांना उपस्थित राहणे जमत नाही. याकरिता आम्ही हा भिमाकोरेगांव विजयोत्सव भरगच्च कार्यक्रमांनी साजरा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ॲड. प्रमोद होसमनी, महेश हट्टीहोळी, अक्षय वीरमुख, रमेश मुंजी, अशोक तळवार, किरण कोळी, गुलाब रजपूत, गणपती कांबळे, रविंद्र कांबळे, प्रकाश ईटेकर, गुरुनाथ शिंगे, संतोष सत्यनाईक, बाळू कोळी, राहुल वारकरी, बाबू भूसगोळ, संतोष सत्यनाईक, अभिषेक, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बाळंतिणीचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू?

Spread the love  संकेश्वर : डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील संकेश्वरजवळील निडसोसी प्राथमिक आरोग्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *