Thursday , June 4 2026
Breaking News

हलशीत भाताच्या गंजीला आग, ३० पोती भाताचे नुकसान

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : हलशीतील (ता. खानापूर) गावचा सर्वे नंबर ३/१ मधील कक्केरी शेतात शुक्रवारी दि. ३१ डिसेंबर रोजी मध्य रात्री अज्ञातानी भाताच्या गंजीला आग लावल्याची घटना घडली.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, हलशी (ता. खानापूर) येथील शेतकरी नामदेव सोमू गुरव यांच्या सर्वे नंबर ३/१ मधील कक्केरी शेतात साठून ठेवलेल्या ३० पोती भाताच्या गंजीला शुक्रवारी मध्यरात्री अज्ञातानी आग लावुन पेटवून दिले. त्यात त्यांचे ३० पोती भाताचे नुकसान झाले.
नामदेव सोमू गुरव हे शनिवारी सकाळी भाताची मळणी घालावी. म्हणून शेताकडे गेले होते. मात्र त्याच भाताच्या गंजीला आग लागल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे त्यांना धक्काच बसला. लागलीच त्यांनी ओरडा ओरड करून आग विझवण्यासाठी प्रयत्न केला. काहीनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र जास्तीतजास्त भाताची गंजी जळून गेली होती.
यावेळी घटनास्थळी तलाठी कार्यालयाचे बाबाजान सनदी यांनी भेट देऊन पंचनामा केला.
तर शेतकरी नामदेव सोमु गुरव यांनी नंदगड पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास करत आहेत.
यंदा अवकाळी पावसाने भात पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले आहे. अशा संकटात असतानाच कोणी अज्ञातानी भाताच्या गंजीला आग लावल्याने ३० पोती भाताचे नुकसान झाले. त्यामुळे नामदेव गुरव या शेतकऱ्यांचे ५० हजार रूपयाचे नुकसान झाले आहे. संबंधित शेतकऱ्याला सरकारने आर्थिक मदत करून द्यावी. अशी मागणी सर्व थरातून होत आहे.
या घटनेमुळे हलशी भागातून हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध गोहत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध हिंदू संघटना, धार्मिक संस्था, सामाजिक संघटना तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *