खानापूर : दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी पार पडलेल्या लोंढा विभागीय स्तरावरील मेडलीन इंग्रजी माध्यमिक शाळेच्या वतीने आयोजित लोंढा विभागीय क्रीडा स्पर्धेत श्री रवळनाथ हायस्कूल शिवठाण शाळेने घवघवीत यश संपादित केले आहे. क्रिडा स्पर्धेत लोंढा विभागातील विविध माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये गोधोळी, कापोली, शिवठाण, शिरोली, माडीगुंजी, लोंढा हायस्कूल, लोंढा इंग्रजी माध्यम तसेच मेडलीन इंग्रजी माध्यमिक शाळा इत्यादीनी सहभाग घेतला होता. यामध्ये श्री रवळनाथ स्कूल शिवठाण शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करून सांघिक तसेच वैयक्तिक क्रिडा प्रकारामध्ये घवघवीत यश संपादन केले. सांघिक खेळामध्ये 4 प्रथम क्रमांक आणि वैयक्तिक स्पर्धेमध्ये 17 असे एकूण 21 क्रमांक पटकावून सर्व साधारण विजेतेपद आपल्याकडे राखून ठेवले. या यशाबद्दल शिवठाण पंचक्रोशीतील क्रिडाप्रेमी व शिक्षणप्रेमी यांच्याकडून सर्व स्पर्धकाचे अभिनंदन होत आहे.
मुलांच्या सांघिक क्रिडा प्रकारात कबड्डी आणि व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम तर मुलींच्या सांघिक स्पर्धेत थ्रोबॉल स्पर्धेत प्रथम. मुलांच्या वैयक्तिक धावण्याच्या स्पर्धेत 400 मी. मध्ये सुशांत गणपती पाटील द्वितीय, 800 मी. मध्ये भीमराव टोपाण्णा मिराशी प्रथम, बळीराम नागाप्पा गायकवाड द्वितीय, 1500 मी. मध्ये रोहिदास विठ्ठल यळगुन्नावर प्रथम, 3000 मी धावणे आणि 5 कि.मी. चालणेमध्ये स्वयम लक्ष्मण आजरेकर प्रथम तर भालाफेक लमध्ये तृतीय, थाळीफेक मध्ये लक्ष्मण नागाप्पा कोलकार प्रथम, 5 कि.मी. चालण्याच्या स्पर्धेत कृष्णा शिवाजी गावडे द्वितीय, तिहेरी उडीत गुरुनाथ संजय गुरव याने तृतीय क्रमांक पटकाविला.
मुलींच्या वैयक्तिक धावण्याच्या स्पर्धेत 400 मी. मध्ये वैभवी दत्ता पाटील द्वितीय, 3000 मध्ये पूजा जाणू गावडे तृतीय, 3 कि.मी. चालणे आणि गोळाफेक स्पर्धेत दिव्या लक्ष्मण शिरोडकर प्रथम, उंच उडीमध्ये नम्रता प्रेमानंद पाटील प्रथम, भालाफेक आणि तिहेरी उडीत नेहा हिने तृतीय क्रमांक पटकाविला. सर्व विजयी स्पर्धकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. स्पर्धेत सहभागी आणि विजयी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक श्री. वाय. एन. मजुकर, सचिव प्रसाद वाय. मजुकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. पी. ए. पाटील, शिक्षकवृंद आणि क्रिडा शिक्षक पी. टी. चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले.