Saturday , July 27 2024
Breaking News

आमदार डॉ. अंजली निंबाळकरांच्या वक्तव्याचा खानापूर म. ए. समितीकडून जाहीर निषेध

Spread the love

खानापूर (वार्ता) : परप्रांतातून येऊन खानापुरात आमदारकी मिळवणार्‍या आमदार डॉ. अंजली निंबाळकरांनी इथल्या मूळ निवासी जनतेला शिकवू नये, निवडणुकीपूर्वी मराठी मते मिळवण्यासाठी मराठी भाषा आणि संस्कृतीचा आग्रह धरणार्‍या निंबाळकरांनी कन्नड धार्जिण्या नेत्यांना खूष करण्यासाठी मराठी जनतेच्या विरोधात गरळ ओकून खायचे दात दाखवले आहेत, भविष्यात तालुक्यातील मराठी भाषक जनता त्यांना नक्कीच त्यांना घरचा रस्ता दाखवतील, असे विचार खानापूर तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मारुती परमेकर यांनी मांडले.
शिवस्मारक येथे तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची शुक्रवारी बैठक संपन्न झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते, आमदार डॉ. निंबाळकर यांनी इटगी ता. खानापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात कर्नाटक राहणार्‍या इथल्या मातीशी गद्दारी करणार्‍या राज्यद्रोह्यांनी हा भाग सोडून त्यांना तिकडे जायचे आहे तिकडे जावे असे वक्तव्य केले. खरे तर त्यांनी अप्रत्यक्षरित्या इथल्या तालुक्यातल्या मराठी जनतेला अनुसरून हे वक्तव्य केले असल्याचा आरोप समितीने केला.
यावेळी बोलताना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील म्हणाले, मुंबई प्रांतात असलेला हा भाग पूर्वीपासूनच महाराष्ट्राचा भूभाग आहे. त्यामुळे आम्ही आमचा हा भाग महाराष्ट्रात विलीन व्हावा यासाठी महाराष्ट्र एकीकरण सीमा चळवळीच्या माध्यमातून गेली 65 वर्षे संघर्ष करतो आहोत, हा लढा निर्णायक वळणावर असताना मातृभाषा मराठी आणि मराठी संस्कार असलेल्या आमदार डॉ. निंबाळकरांनी असे वक्तव्य करून खर्‍या अर्थाने माय मराठीची प्रतारणा केली आहे. खुद्द त्याच या ठिकाणी अतिक्रमित असून त्यांच्या तोंडी हे शब्द शोभत नाहीत, केवळ तालुक्यातल्या मूठभर कन्नडिगाना खूष करण्यासाठी त्यांनी असे वक्तव्य केले आहे. येत्या काळात त्यांनाच हा भूभाग सोडून इतरत्र जाण्यास भाग पाडू.
यावेळी बोलताना पांडू सावंत म्हणाले, तालुक्यातले विकासाचे अपयश लपविण्यासाठी चर्चेत राहण्याच्या हेतूने त्यांनी हे वक्तव्य केले आहे. हे मराठी मतांवर निवडून येऊन त्या मतदारांशी त्यांनी चेष्टा केली आहे.
निरंजन सिंग सरदेसाई म्हणाले, राज्यद्रोह या शब्दाचे व्याख्या त्यांना समजू नये इतक्या त्या अडाणी नाहीत. ज्या मराठी जनतेने त्यांना पसंती दिली त्यांनी वेळीच सावध व्हावे, अन्यथा इथल्या मराठी जनतेचा स्वाभिमान काढून घेण्यात येईल. वरिष्ठांना खूश करण्यासाठी त्यांनी खुद्द इथल्या जनतेला अपमानाची वागणूक दिली असल्याचे मत त्याने मांडले.
यावेळी गोपाळ पाटील, जगन्नाथ बिर्जे, सुरेश देसाई, राजू पाटील, कृष्णा कुंभार, विनायक सावंत, सूर्याजी पाटील, पी. एच. पाटील, रणजीत पाटील आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

तिरडीवरून नेलेल्या आमगावच्या “त्या” दुर्दैवी महिलेचा अखेर मृत्यू

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील एका टोकास वसलेल्या दुर्गम भागातील आमगाव येथील महिलेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *