संकेश्वर (वार्ता) : कर्नाटक राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमीक्रॉनचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. आतापर्यंत 6 हजार लोक बाधीत झाले आहेत. हुक्केरी तालुक्यात ओमीक्रॉनची एंट्री झाली असून तीन जणांना ओमीक्रॉनची बाधा झाली आहे. यामध्ये आरोग्य विभागातील एका व्यक्तीचा समावेश असल्याचे हुक्केरी तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार यांनी सांगितले. ते अंमणगी येथील श्री मल्लिकार्जुन यात्रोत्सवनिमित्त आयोजित सभेनंतर पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, राज्यात ओमीक्रॉनचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. ओमीक्रॉनने बघता-बघता जिल्ह्यात आणि तालुक्यात एंट्री केल्यामुळे जिल्हा तालुका प्रशासन, पोलिस विभाग नव्या व्हेरिएंटचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाले आहे. हुक्केरी तालुका महाराष्ट्र राज्याच्या सिमेलगत असल्याने चार ठिकाणी चेकपोस्ट उभे करुन महाराष्ट्र राज्यातून कर्नाटकात प्रवेश करणार्या प्रवाशांची 24ु7 रात्रंदिवस कसून तपासणी केली जात आहे. बाहेर राज्यातून येणार्या प्रवाशांना दोन्ही व्हॅक्सीनेसन आणि आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. चेकपोस्टवर पोलीसांसमवेत आरोग्य विभागाचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी कसून चौकशीचे कार्य करताहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका अधिक असल्याने कोणीही बेफिकीर राहू नये. हुक्केरी तालुक्यात ओमीक्रॉनला रोखण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. अद्याप कोरोना सेंटर प्रारंभ करण्याची वेळ आलेली नसली तरी शासकीय रुग्णालयात ओमीक्रॉन रुग्णांना लागणारे बेड, औषधोपचार, ऑक्सिजन अशी सर्व तयारी करण्यात आली आहे. ओमीक्रॉनला हुक्केरी तालुक्यातील नागरिकांनी सहजपणे न घेता कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तालुका अधिकारी उपस्थित होते.
Check Also
घटप्रभा नदीत बुडून दोन मुलासह वडिलांचा मृत्यू
Spread the love हुक्केरी : मासे पकडण्यासाठी नदीत उतरले असता वडीलासह दोन मुलांचा नदीत बुडून …