खानापूर : लक्केबैल कृषी पत्तीन सोसायटीचे सेक्रेटरी प्रकाश पांडुरंग पाटील (वय 48) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली असून आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही.
याबाबतची माहिती अशी की, लोकोळी येथील रहिवासी असलेले प्रकाश पांडुरंग पाटील, हे लक्केबैल कृषी पत्तीन सोसायटीत बऱ्याच वर्षापासून सचिव पदाची जबाबदारी सांभाळत होते. पण काल मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी दुपारी लक्केबैल येथील कृषी पतीन सोसायटीच्या कार्यालयीन इमारतीमध्ये एकटे असताना कीटकनाशक असलेले विष प्राशन केले. ही बाब थोड्या वेळानंतर इतरांच्या लक्षात येताच, ताबडतोब त्यांना खानापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी बेळगाव येथे पाठविण्यात आले होते. परंतू उपचाराचा काहीही उपयोग न होता. त्यांचे आज निधन झाले असल्याचे समजते. याबाबत खानापूर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली असून, उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta