खानापूर (प्रतिनिधी) : चापगाव (ता. खानापूर) येथील श्री गणेश समुदाय भवनाचा स्लॅब भरणी सोहळा सोमवारी पार पडला.
कार्यक्रमा अध्यक्षस्थानी गावडू फोंडू पाटील होते.
यावेळी माजी आमदार अरविंद पाटील यांच्याहस्ते स्लॅब भरणी शुभारंभ करण्यात आला.
प्रारंभी दीपप्रज्वलन सुरेश पाटील माजी अध्यक्ष कुस्ती संघटना खानापूर, मारुती मादार ग्राम पंचायत उपाध्यक्ष, सयाजी पाटील माजी सभापती यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी विविध देवदेवतांच्या फोटोचे पुजन शिवाजी कणबरकर, शामराव पाटील मुतगा, कुस्तीकोच हणंमत पाटील, मल्लापा मारीहाळ, हणंत पाटील, लक्ष्मण पाटील असोगा, डाॅ. शंकर पाटील, भालचंद्र आदी मान्यावरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी स्लॅब भरणी सोहळ्याला गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
