खानापूर प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील गर्लगूंजी गावच्या डाॅक्टरांचा जागतिक वैद्यकिय दिनाचे औचित्य साधुन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती गर्लगुंजीतील डॉ. शहापुरकर, डॉ.अरुण भातकांडे, डॉ. कृष्णा वड्डेबैलकर, डॉ. नामदेव शिवाप्पाचे यांना मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
देशभरात कोरोनाच्या महामारीमुळे सामान्य जनतेला मृत्यूशी झुंज द्यावी लागली. या काळात खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागातील जनतेची आपला जीव धोक्यात घालून सेवा बजावलेल्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला व डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सदानंद पाटील, परशराम गोरे, राहुल पाटील, मारुती गोरे, कुमार पाटील, सोमनाथ यरमाळकर, निवृती मेलगे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
