खानापूर (प्रतिनिधी) : तळावडे (ता. खानापूर) येथील प्राथमिक मराठी शाळेची विद्यार्थिनी कु. अंकिता सलाम हिने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवले याबद्दल जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष विलास बेळगावकर, उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी, सामाजिक कार्यकर्ते भैरू वाघू पाटील, ग्रामपंचायत सदस्य हणमंत कोदाळकर, दिलीप हन्नूरकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी तिला अकराशे रूपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. यावेळी तिला मार्गदर्शन केलेल्या शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. नववी ते बारावी पर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शिष्यवृत्ती देऊन तिच्या पुढील शिक्षणासाठी मदत केली आहे.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवर्ग यांचाही गौरव करण्यात आले.
