बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात वाढलेले कोरोना रुग्ण लक्षात घेऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने मराठा मंदिरच्या सहकार्याने मराठा मंदिर आवारात सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झालेले अनेक रुग्ण विनामूल्य बरे झाले आणि आम्ही सामाजिक कार्यातही अग्रेसर आहोत हे मराठा मंदिरने दाखवून दिले. रुग्णांच्या प्रदीर्घ सेवेनंतर गेल्या पंधरा दिवसापासून हे कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले असून मराठा मंदिरातील कार्यक्रमांना पूर्ववत सुरुवात झाली आहे, असे मराठा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. आप्पासाहेब गुरव यांनी कळविले आहे
Check Also
सहाव्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनात डॉ. संजय कळमकर यांचे व्याख्यान
Spread the love बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर यांच्या संयुक्त …