खानापूर : बेळगाव येथील राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळयात बेळगाव विभागातुन यळ्ळेबैल (ता. खानापूर) येथील प्राथमिक मराठी शाळेच्या शिक्षिका सौ. रेणूका नारायण चिरमुरकर यांची निवड झाली.
त्यानिमित्त इंन्टीग्रेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगाव, नॅशनल रूरल डेव्हलमेंट फाऊंडेशन बेळगाव यांच्या कर्नाटक महाराष्ट्र, गोवा, गुजरात व दिल्ली राज्यातुन राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण केले जाते.
हा पुरस्कार येळ्ळेबैल (ता. बेळगांव) प्राथमिक मराठी शाळेच्या शिक्षिका सौ. रेणूका नारायण चिरमुरकर यांना देण्यात आला.
शिक्षिका सौ. रेणूका चिरमुरकर यांनी हलख्यातुन शिक्षण घेऊन शिक्षकी सेवा सुरू केली. त्यामुळे कुटुंबाचे व बेळगाव तालुक्याचे नाव उज्वल केले. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून सौ. रेणूका चिरमुरकर या खानापूर तालुका डाॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. डी. ई. नाडगौडा यांच्या त्या मामी होत.
Belgaum Varta Belgaum Varta