खानापूर (वार्ता) : खानापूर शहरातील वॉर्ड नंबर 1 मधील आश्रय कॉलनीमध्ये रहदारीच्या ठिकाणी उभारण्यात आलेला विद्युत्त खांब्यावरील ट्रान्सफॉर्म बदलण्याची मागणी वॉर्ड नंबर एक मधील आश्रय कॉलनीतील नागरिकांनी तहसील कार्यालय, हेस्कॉम खाते तसेच नगरपंचायातीच्या अधिकारी वर्गाना निवेदन देऊन केली.
निवेदनात म्हटले आहे की, वॉर्ड नंबर एक मधील आश्रय कॉलनीमध्ये 11000 व्हॅटची ट्रान्सफॉर्म बसविला आहे. ट्रान्सफॉर्मला लागुन घरे आहेत. येथून लोकांची वर्दळ सुरू असते. शिवाय याठिकाणी लहान मुले सतत खेळत असतात. शिवाय या ट्रान्सफॉर्मतून आगीच्या ठिणगी पडत असतात. त्यामुळे याचा धोका आश्रय कॉलनीमधील लोकांना सहन करावा लागतो. वेळ काही सांगून येत नाही. लहान मुले खेळत असताना आगीची ठिणगी पडून जीवीतहानी झाली तर याला कोण जबाबदार? तेव्हा आश्रय कॉलनीमधील ट्रान्सफॉर्म बदलून अन्यत्र बसवावा, अशा मागणीचे निवेदन उपतहसीलदार के. वाय. ब्रिद्री, हेस्कॉमच्या अभियंत्या सौ. कल्पना तिरवीर, नगरपंचायतींच्या मुख्याधिकार्यांनाही देण्यात आले.
यावेळी उपतहसीलदार के. वाय. बिद्री यांनी निवेदन स्विकारून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. निवेदन देताना नगरसेविका फातिमा बेपारी, मारूती जाधव, अभिषेक शहापूरकर, इसखान पटाण, मंगल नाईक, दिनेश खनगावकर, परशराम बिरसे, दिपक सुतार, लक्ष्मण शिंदे, मेघा जाधव, गंगा निलजकर, अरबाझ बस्तवाडकर, आयाझ बेपारी, बाबू गोरल आदी मान्यवर उपस्थित होते.
Check Also
शिरोली येथील बेकायदेशीर वृक्षतोडी प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा; डॉ. अंजली निंबाळकर यांचे वनमंत्री ईश्वर खंड्रे यांना निवेदन
Spread the loveखानापूर : खानापूर तालुक्यातील शिरोली येथील सर्वे नंबर 97 मध्ये खासगी जमिनीत बेकायदेशीररित्या …