

खानापूर : खानापूर तालुका भूविकास बँकेची पंचवार्षिक निवडणूक 15 संचालकांपैकी 13 संचालकांची बिनविरोध निवड रविवारी पार पडली. परंतु कक्केरी व गर्लगुंजी या दोन जागांवर एकमत न झाल्याने या दोन जागांसाठी 28 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. खानापूर भूविकास बँकेचे माजी चेअरमन मुरलीधर गणपतराव पाटील यांची सलग चौथ्यांदा संचालक पदी निवड झाली आहे.
खानापूर तालुका भूविकास बँकेने गेल्या पंधरा वर्षांत खानापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना पतपुरवठा करून न्याय देण्याचे काम केले आहे. यासाठी विद्यमान अध्यक्ष मुरलीधर पाटील यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. त्यांनी आपले सहकारी संचालकांना सोबत घेऊन संस्थेचा कारभार पारदर्शक चालविला आहे व बँक यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचविली आहे. मुरलीधर पाटील यांनी सतत दोन वेळा या बँकेचे यशस्वी अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांची पुन्हा बँकेच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्यास ते हॅट्रिक साधणार.
बिनविरोध झालेल्या 15 संचालकापैकी 13 संचालकांच्या मंडळामध्ये श्री. मुरलीधर गणपतराव पाटील (जळगा), अशोक बाबू पाटील (चिकदिनकोप), सुदीप बसनागौडा पाटील (इटगी), नारायण नागप्पा पाटील, (बिजगरणी), लक्ष्मण खेमा कसर्लेकर (आमटे), सुभाष निंगाप्पा गुरव (हलशी), लक्ष्मी शिवाप्पा पाटील (तिवोली), सुलभा धनाजी आंबेवाडकर (बेकवाड), सुनिल विठ्ठल चोपडे, (माळअंकले), कुतुबुद्दीन उस्मान बिच्चनावर (माडीगुंजी), यमनाप्पा चंदप्पा राठोड, (खानापुर), श्रीकांत सहदेव करजगी (गोळीहल्ली), शंकर विष्णू सडेकर उर्फ जांबोटकर, (जांबोटी) यांची बिनविरोध निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
येत्या 28 डिसेंबर रोजी उर्वरित गर्लगुंजी आणि कक्केरी विभागासाठी निवडणूक होत आहे. गर्लगुंजी विभागातून विरुपाक्षी महादेव पाटील (बरगाव) व तानाजी दत्तू कदम, (निडगल) यांच्यात तर कक्केरी विभागातून प्रकाश सोमणींग अग्रोळी (कक्केरी) व नीळकंठ कृष्णाजी गुंजीकर (कक्केरी) या दोघांमध्ये बिनविरोधसाठी प्रयत्न करण्यात आले मात्र एकमत न झाल्याने निवडणुकीला सामोरे जावे लागणार.
दरम्यान सदर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी आमदार व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तसेच भाजपाचे माजी अध्यक्ष संजय कुबल, सामाजिक कार्यकर्ते यशवंत बिर्जे यांनी बरेच प्रयत्न केले. त्याबद्दल भूविकास बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक मुरलीधर पाटील यांनी या सर्वांचे आभार मानले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta