
खानापूर : मलप्रभा नदी घाटाजवळ मन्नूर-बेळगाव येथील एक युवक धार्मिक कार्यासाठी व पडल्या भरण्यासाठी आला होता. यावेळी तो नदीत उतरला असता बुडाल्याची घटना घडली आहे. समर्थ मल्लाप्पा चौगुले (वय अंदाजे 22 वर्षे) असे या बुडालेल्या युवकाचे नाव असून त्याचा शोध सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि खानापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशामक दलाचे मनोहर राठोड, खानापूर पोलीस स्थानकाचे पीआय लालसाब गोवंडी, पीएसआय बिरादार आणि इतर पोलीस कर्मचारी शोधकार्य करत आहेत.
सध्या नदी किनारी शोधमोहीम सुरू असून स्थानिक नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


Belgaum Varta Belgaum Varta