Wednesday , December 17 2025
Breaking News

दिवसकार्य शिक्षणप्रेमी कुटुंब प्रमुखाचे; समाजकार्य कुटुंबाचे

Spread the love

 

खानापूर : गेल्या दिनांक 19 जानेवारी रोजी चन्नेवाडी ता. खानापूर येथील विद्यार्थिप्रिय आदर्श श्री. राजाराम लक्ष्मण पाटील यांचे निधन झाले, त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती, आपल्या आयुष्यच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी वाचन केले, त्यांना कविता, संगीत नाट्य व गीतरामायण सारखे अनेक कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये रुजविले, चन्नेवाडी गावात छोटेसे ग्रंथालय व्हावे असा त्यांचा मानस त्यांनी बोलून दाखविला होता, या त्यांच्या इच्छेला अनुसरुन दिनांक 30 जानेवारी रोजी त्यांच्या दिवसकार्याच्या दिवसाचे औचित्य साधून त्यांच्या कुटुंबीयांनी रा. ल. पाटील गुरुजी यांनी वाचन केलेली पुस्तके, तसेच काही नवी पुस्तके व बाळगोपाळाना वाचनीय अशी पुस्तके भेट म्हणून सरकारी मराठी प्राथमिक शाळेला भेट देण्यात आली, यामध्ये ज्ञानेश्वरी, शिवरायांचे सात शिलेदार, रामायण, भगवत गीता, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, एपीजे अब्दुल कलाम,स्वामी विवेकानंद, आशा जवळपास सत्तरहुन अधिक पुस्तकांचा यामध्ये समावेश आहे.

आमच्या वडिलांनी शिक्षणाची गंगा सतत वाहत व तेवत ठेवली, आम्हीही त्यांच्या या विचारांना समाजात सतत रुजवत ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहू व त्यांच्या इच्छेनुसार एक छोटेसे ग्रंथालय चन्नेवाडी गावात करण्याचा प्रयत्न करू, यासाठी आजच्या दिवशी ही पुस्तके शाळेला भेट देऊन छोटासा प्रयत्न आमच्या कुटूंबियांकडून करत आहोत, तसेच यामध्ये काही बाळगोपाळांची पुस्तके ज्येष्ठ पत्रकार शिवाजी शिंदे यांनी दिली आहे, त्यांचेही आभार मानत वरील मनोगत खानापूर युवा समितीचे अध्यक्ष व रा. ल. पाटील यांचे चिरंजीव धनंजय पाटील व्यक्त केले.

तर असा उपक्रम राबवून पाटील कुटुंबीयांनी समजा समोर एक आदर्श निर्माण केला आहे व या त्यांच्या कृतीने रा. ल. पाटील यांनीही आनंद झाला असेल व त्यांना ही खरी श्रद्धांजली असेल असे गावातील ज्येष्ठ नागरिक आर. डी. पाटील यांनी सांगितले.

शाळेचे शिक्षक प्रकाश देसाई यांनी पाटील कुटुंबियांचे या उपक्रमा बद्दल आभार मानत, या वाचनीय पुस्तकांचा गावातील वाचनप्रेमी नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व आपल्या ज्ञानात भर घालावी, असे आवाहन केले.

या कार्यक्रम प्रसंगी उद्योजक लक्ष्मण पाटील, पुणे येथील उद्योजक श्रीधर पाटील, भारतीय सैन्यदलातील अभिषेक पाटील, अंगणवाडी शिक्षिका वैष्णवी पाटील, ईश्वर पाटील, गणेश पाटील, भावेश पाटील, दुर्वांक पाटील, अदिती पाटील, फाल्गुनी पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव कृषी खात्याच्या अधिकाऱ्यावर लोकायुक्त पोलिसांचे छापे

Spread the love  बेळगाव : कृषी खात्याचे बेळगाव जिल्हा दक्षता दलाचे सहसंचालक राजशेखर इराप्पा बिजापूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *