बेकवाड येथील घटना
खानापूर (प्रतिनिधी): बेकवाड (ता. खानापूर) जवळील बंकी बसरीकट्टी शिवारात रोपलगावडीचा चिखल करण्यासाठी गेलेला ट्रॅक्टर बांधावरून चढविताना उलटून झालेल्या अपघातात ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली.
वृषभ येरमाळ (वय २७) असे त्याचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेकवाड येथे चिरेखाणीत काम करण्यासाठी हावेरी येथील ड्रायव्हर स्थायीक झाला होता. सदर ड्रायव्हर बंकी बसरीकट्टीत मामाच्या शिवारात चिखल करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन आला होता.
चिखल करून रस्त्याजवळील मोठ्या बांधावरून ट्रॅक्टर चढविताना समोरील चाके उचलल्याने ट्रॅक्टर पलटी झाला त्यात ड्रायव्हर खाली सापडून जागीच ठार झाला.
ही बातमी कळताच शिवारातील शेतकरी लागलीच घटनास्थळी दाखल झाले. लागलीच जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टर बाजुला करून मृत्यूदेह बाहेर काढण्यात आला.
नंदगड पोलिस ठाण्यात ही बातमी कळताच पोलिस उपनिरीक्षक सपाटे व पोलिस कर्मचारी वर्गाने पंचनामा केला. या अपघाताने बेकवाड भागात हळहळ व्यक्त होत आहे.
Check Also
गणेबैल टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन! बेकायदेशीर टोलनाका बंद करण्याची मागणी
Spread the love खानापूर : गणेबैल येथील बेकायदेशीर उभारण्यात आलेला टोल नाका बंद करण्यात यावा …