खानापूर (प्रतिनिधी) : मुसलमानच्या बकरी ईद सणात गोहत्या केली जाते. मात्र हिंदू धर्मात गाईला माता मानतात. तिची पुजा करतात.
मुसलमानानी बकरी ईदच्या सणात गोहत्या करू नये.
कारण हिंदूच्या भावना दुखावल्या जातात. यासाठी मुसलमान बांधवानी गोहत्या थांबवावी. अन्यथा खानापूर तालुका भाजप गप्प बसणार नाही, अशी सुचना तहलीदार रेश्मा तालिकोटी, पोलिस निरीक्षक सुरेश सिंगे आदिंना करण्यात आली आहे.
नुकताच भाजपची बैठक झाली. यावेळी बोलताना तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल म्हणाले, हिंदू धर्मात गाईला देवता मानतात. तिची पुजा करतात, तिच्या शेणापासुन औषध केले, गोमुत्र गुणकारी औषध असे असताना गोहत्या करणे हे हिंदू धर्मात पाप आहे. यासाठी येणाऱ्या बकरी ईद सणाला गोहत्या थांबवावी, अशी सुचना करण्यात आली.
बैठकीत जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, किरण येळ्ळूरकर व इतरानी विचार मांडले.
यावेळी बैठकीला तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, जनरल सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, किरण येळ्ळूरकर, वसंत देसाई, सुनिल नाईक, भाजपचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात चोरी!
Spread the loveखानापूर : खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात काल रात्री चोरी झाली असून …