खानापूर (प्रतिनिधी) : बऱ्याच वर्षानी मराठी भाषिक म्हणून ओळखणाऱ्या खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक नागरिकांना शिक्षक भरतीशिवाय कर्नाटकात कोणतीच नोकरीची संधी नाही. त्यामुळे तालुक्यात अनेक युवक- युवती बेकार आहेत.
बऱ्याच वर्षानंतर तालुक्यात अंगणवाडी शिक्षक आणि हेल्पर भरतीसाठी ऑनलाईन अर्जाची मागणी करण्यात आली आहे.
त्यामुळे प्रत्येक युवतीला अंगणवाडी शिक्षिका होण्याची इच्छा आहे. कारण इतर कोणत्याच खात्यात मराठी भाषिक उमेदवाला संधी नाही आहे. तालुक्यात हजारो युवक-युवती पदवीधर आहेत. मात्र कर्नाटकात कन्नड माध्यमचा हट्ट धरून मराठी भाषिकांवर गेली ६५ वर्षे नोकरीसाठी संधी देण्यात आली नाही आणि यापुढे मराठी भाषिकांना इतर खात्यात कन्नड माध्यमचा मुद्दा पुढे करून सरकारी नोकरी मिळणे कठीण आहे. यासाठी नुकताच तालुक्यातील मराठी भाषिक गावातून अंगणवाडी शिक्षिका व अंगणवाडी हेल्पर भरती होणार याची संधी मिळविणे गरजेचे आहे.
तालुक्यात केवळ चार अंगणवाडी शिक्षिका व ११ अंगणवाडी हेल्पर इतक्याच जागा नियुक्तीसाठी दाखविण्यात आल्या आहेत.
तेव्हा तालुक्यात अंगणवाडी शिक्षिका म्हणून घोटगाळी, हडलगा, मुडेवाडी, कारलगा या चार जागा आहेत. तसेच अंगणवाडी हेल्परसाठी खानापूर शहर कडोलकर गल्ली, गर्लगुंजी, मुंढवाड, गोधोळी, लिंगनमठ, खानापूर शहर डोंबर वसाहत, वड्डेबैल, शिवोली, संगरगाळी, लोंढा, डोंगरगाव, आदी गावातून जागा भरावयाच्या आहेत.
तेव्हा अंगणवाडी भरतीसाठी तालुक्यातील युवतीनी ऑनलाईन अर्ज करून या संधीचा फायदा करून घेणे गरजेचे आहे.
Check Also
टेनिस हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी मराठा मंडळ ताराराणी कॉलेजच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय निवड
Spread the love खानापूर : मराठा मंडळ ही शिक्षण संस्था क्रीडा स्पर्धेत खेळाडू विद्यार्थ्यांना नेहमीच …