खानापूर (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण समिती व संयुक्त महाराष्ट्र समिती यांनी उभारलेल्या आंदोलनात सीमाभागीतील तसेच कुप्पटगिरी (ता. खानापूर) गावचे कै. नागाप्पा होसुरकर व सीमाभागातील अनेक जणांना हौतात्म्य पत्करले. त्या हुतात्म्यांना 17 जानेवारी रोजी आदरांजली वाहण्यासाठी शुक्रवारी दि. 14 रोजी पत्रके वाटून खानापूर शहरासह तालुक्याच्या सीमाभागात जनजागृती केली.
यावेळी सोमवारी दि. 17 रोजी खानापूर म. ए. समितीच्यावतीने हुतात्मा दिन गांभीर्याने पाळला जावा, असे असे आवाहन माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले.
खानापूर म. ए. समितीचे दोन्ही गट एकत्र येऊन सोमवारी हुतात्मा दिन पाळला जाणार आहे. ही पत्रके खानापूर शहरातील बाजारपेठ, चिरमुरकर गल्ली, बूरूड गल्ली, निंगापूर गल्ली, स्टेशनरोड आदी भागात तसेच सीमाभागातील जनेतच्या हातात देण्यात आली आहे. तालुक्यात दोन्ही गट एकत्र आल्याने सीमाभागातील जनतेतून समाधान पसरले आहे.
पत्रक वाटताना माजी आमदार दिगंबर पाटील, कार्यदर्शी यशवंत बिरजे, आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, विवेक गिरी, पुंडलिक पाटील करंबळ, कृष्णा कुंभार, रूक्माणा झुंजवाडकर, विशाल पाटील, महादेव घाडी, बी. बी. पाटील, अमृत पाटील, आदी समितीचे नेते उपस्थित होते.
