
खानापूर : मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर हे विद्यार्थ्यांच्या सर्वगुणसंपन्नत्तेवर भर देणारे नामांकित महाविद्यालय असून या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमात अग्रेसर असतात हे आपण नेहमीच वर्तमान पत्रात व सोशल मेडियावर पहात असतो.
येथील विद्यार्थिनी अभ्यासातही आपला रूबाब राखून आहेत. गेले अनेक वर्षे इयत्ता बारावी वार्षिक परीक्षा निकालात त्या अव्वल स्थानी असतात. हिच परंपरा यावर्षीही त्यांनी अखंडितपणे चालू ठेवली आहे. मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या प्रोत्साहन व मार्गदर्शनाखाली येथील विद्यार्थिनी सातत्याने आपला शैक्षणिक अलेख उंचावताना दिसतात. मराठा मंडळाचे संचालक श्री. शिवाजीराव पाटील व ज्येष्ठ संचालक श्री. परशराम गुरव यांचे नेहमीच पाठबळ असते.
तालुक्यातील वाणिज्य आणि कला शाखेत उज्ज्वल यशाची परंपरा राखणाऱ्या विद्यार्थ्यांनीनी सीसीटीव्ही व वेबकास्टिंग सारख्या परिक्षा केंद्र निरिक्षण पध्दतीचा दबाव न घेता आपल्या उत्तर पत्रिका छान लिहून मोकळ्या झाल्या आणि त्यांना अपेक्षित यशही मिळालं.
कला शाखेत कुमारी गिरीजा करीमुद्देकशन्नवर 75.35% 2. गुण घेऊन प्रथम, कु. सुखदेवी एम. मादार 73.5% 3 ही द्वितीय, कु.मुबस्सरीन अंडलगी 70.5% 4. तृतीय, कु.श्रृती महेशवाडगी 68.83% चौथी कु मनिषा हा. बरुकर 68.33% व पाचवा क्रमांक कु सहानी उशीनकर 66.16%
कला शाखेचा एकून निकाल ६१% लागला
तर…………
वाणिज्य शाखेच्या विशेष गुणवत्तेसह क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक कुमारी सविता मधुकर मिराशी 91.51%2., द्वितीय किर्ती कृष्णा शिवणगेकरचे 91.15%, तृतीय मोहीणी शिवाजी पाटील 91% चौथी कु.शताक्षी दत्तात्रय पाटील 89.33%, पाचवी कु. ज्ञानेश्वरी फो. शिवठणकर 89% सहावी कु.तहनीयात अश्फाक खानापूरी 88.5% सातवी कु. वैजयंती गंगाराम ठाकर 88% आठवा क्रमांक कु. आरती अरुण पाटील 86.33% नवावा क्रमांक कु समृध्दी शंकर पाटील 86% 10. दहावा क्रमांक सलेहा मो. सनदी 84.33% तसेच 11. कु संतोषी तानाजी पाटील 84.33%, 12. कु तनिष्का गोविंद पाटील 84.16%, 13. कु मानशी टोप्पाणा मिराशी 83.66%
या विद्यार्थिनींना प्राचार्य अरविंद पाटील व समस्त प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले असून या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून सदर
विशेष गुणवत्ता घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनींचा काॅलेजच्या सभागृहात संचालक श्री. शिवाजीराव पाटील, पत्रकार विवेक गिरी, पत्रकार संदिप, पत्रकार वासुदेव चौगुले, पत्रकार पिराजी कुराडे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांनींच्या पालकासमवेत मंगळवार दिनांक 9/42025 रोजी सन्मान करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta