खानापूर : विश्व हिंदु परिषद व बजरंग दल खानापूर यांच्या वतीेने शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी हनुमान जन्मोत्सवानिमित्त बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने खानापूर शहरात भव्य शोभायात्रा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रति वर्षाप्रमाणे हनुमान जयंती जन्मोत्सवानिमीत खानापूर शहरात भव्य शोभायात्रा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी 12 एप्रिल रोजी सायंकाळी 4.00 वाजता जांबोटी क्रॉस येथील मलप्रभा क्रीडांगणावरून या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. शोभायात्रेमध्ये श्री प्रभू रामचंद्र व हनुमान यांच्यावर आधारित देखावे निर्माण केलेले चित्ररथ भाग घेणार आहेत. तालुक्यातील बजरंग दल व विश्व हिंदू परिषद तसेच विविध हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या भव्य शोभायात्रा मिरवणुकीत भाग घेण्याचे आवाहन बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने बजरंग दलचे तालुका अध्यक्ष किरण अष्टेकर यांनी केले आहे.