खानापूर : खानापूर तालुक्यातील गुंजी गावच्या मूलभूत समस्यांचे निवारण करण्यासंदर्भात ग्रामपंचायत अध्यक्ष आणि सदस्यांच्या शिष्टमंडळाने विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांची भेट घेत मागणी केली आहे.
गुंजी ग्रामपंचायत आध्यक्षा सौ. स्वाती गुरव व ग्रामपंचायत सदस्यांनी हट्टीहोळी यांची खानापूर तालुक्यातील त्यांच्या गावी चिक्क हट्टीहोळी येथे भेट घेतली.
सदर निवेदनाद्वारे गावातील चार महत्वाच्या समस्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये बेळगाव – गोवा महामार्गावरील गुंजी बाय पास महामार्गाच्या पूर्वेला असलेली जुनी विहीर आहे त्या विहिरीचे पाणी आणण्यासाठी LVUP (लाईट वेहिकल अंडरपास) मार्ग उपलब्ध करून द्यावा तसेच श्री माऊली मंदिराच्या आजूबाजूला दैविवन प्रोजेक्ट, प्राथमिक आरोग्य केंद्र, मराठी शाळा गुंजी ते गुंजी रेलवे स्टेशन रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे अश्या मागण्या केल्या. यावेळी ग्रामीण काँग्रेस नेते एस. एम. बेळवटकर, गुंजी ग्रामपंचायत सदस्य हणमंत जोशीलकर, सदस्या वनिता देऊळकर, अन्नपूर्णा मादार, गुंजीतील नागरिक लक्ष्मण मादार, वासुदेव देऊळकर हे उपस्थित होते.
यावेळी गुंजी ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. स्वाती गुरव व इतर सदस्यांनी महिला बाल समाज कल्याण मंत्र्यांकडे देखील सदर मागण्या मांडल्या आहेत.