Wednesday , April 23 2025
Breaking News

खानापूर तालुक्यात साकारणार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पहिलीच मूर्ती

Spread the love

खानापूर : देशाचे संविधान निर्माते, दीनदयाळांचे आधार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त कालमणी (ता. खानापूर) येथे डॉ. बाबासाहेबांची खानापूर तालुक्यात पहिलीच मूर्ती स्थापन करण्याची योजना गावकऱ्यांनी आखली आहे. त्यानिमित्त सोमवार दिनांक १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंती साजरी झाल्यानंतर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, प्रकाश पाटील, प्रकाश बा. गावडे, आमटे कृषी पत्तीन संघाचे उपाध्यक्ष बळवंत नाईक, सिध्देश्वर सोसायटीचे अध्यक्ष श्रीपाद भरणकर, भूविकास बँकेचे उपाध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर, भाजप नेते पंडित ओगले यांच्यासह जिल्हा व तालुक्यातील मान्यवर उपस्थित राहणार असून, जांबोटी विभाग सीआरसी विठोबा दळवी व जय हनुमान सोसायटीचे अध्यक्ष शाहु राऊत यांनी प्रमूख वक्ते म्हणून उपस्थित राहतील..

सुसज्ज ग्रंथालय उभारण्याचा गावकऱ्यांचा संकल्प…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीजवळच सुसज्ज असे ग्रंथालय उभारण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला असून, त्यामध्ये भारतातील थोर पुरुष – महिलांची पुस्तके मोफत वाचनासाठी ठेवण्यात येतील. जेणेकरून आपल्या देशाच्या वाटचालीत महत्वाचे योगदान दिलेल्या आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या व्यक्तींच्या चरित्रातून आजच्या युवकांच्या आयुष्यात चांगले दिवस यावेत असाच कालमणी गावकऱ्यांचा मानस असेल असे श्री. अनिल कालमनकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

बिडी येथील वृद्ध दाम्पत्य आत्महत्या केल्याप्रकरणी गुजरात येथून एकाला अटक

Spread the love  बेळगाव : सायबर गुन्हेगारांनी व्हिडीओ कॉलवरून लाखो रुपये उकळलेल्यावरून बिडी येथील वृद्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *