
खानापूर : खानापूर येथील “राजा श्री शिवछत्रपती शिवस्मारक” इमारतीच्या मागील बाजूला जुन्या कोर्ट आवारातील. एका मोठ्या झाडांची मुळे आणि बुंध्यामुळे इमारतीला तडे गेले आहेत. मागील दोन वर्षांपासून हे धोकादायक वृक्ष हटविण्याची मागणी शिवस्मारक ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे. परंतु, या आवारातील बेकायदेशीर बांधकामांना वाचवण्यासाठी तालुका पंचायतीकडून टाळाटाळ केली जात होती. शेवटी याची दखल घेऊन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सोमवार दिनांक 21 एप्रिल रोजी शिवस्मारक इमारत व जुन्या कोर्ट आवारातील परिसरास भेट देऊन पाहणी केली. व तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी रमेश मैत्री यांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी बोलावून घेतले व सदर धोकादायक झाड हटविण्याचे आदेश दिले.
यावेळी शिवस्मारकचे ट्रस्टी प्रकाश चव्हाण यांनी सांगितले की, 10 मे च्या आत हे धोकादायक झाड हटवावे, अन्यथा पुढील क्रम घेण्यात येईल व जर काही विपरित घडल्यास त्याला अधिकारीच जबाबदार असतील असा इशारा दिला. यावेळी शिवस्मारक ट्रस्टचे सभासद माजी आमदार दिगंबरराव पाटील, श्रीकांत दामले, ऍड. चेतन मनेरीकर, भाजपा अध्यक्ष बसवराज सानीकोप, लैला शुगर एमडी व भाजपा युवा नेते सदानंद पाटील, भाजपा सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, नगरसेवक नारायण ओगले, वसंत देसाई, राजेंद्र रायका तसेच शिवस्मारक ट्रस्टचे सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta